माझं नेहमी असंच होतं,
तिच्या सोबत असताना ,
शब्दांनाही वेड लागते ,
डोळ्यात तिच्या हरवताना
तिच्या सोबत असताना ,
शब्दांनाही वेड लागते ,
डोळ्यात तिच्या हरवताना
तुझ्या बरोबरचा प्रत्येक क्षण,
आठवणींची आठवण बनून राहील,
तुझ्या रुपाने माझ्या मनात,
सुंदर अशी साठवण बनून राहील
शोधत बसशील राणी ,चातका सारखी थेंबाना ,
डोळ्यातच असेन मी ,अन विचारशील तू मनाला ,
डोळ्यातच असेन मी ,अन विचारशील तू मनाला ,
नजरेस भिडेल नजर तेव्हा, कशी लाजून लाजून जाशील ,
मग स्वतालाच लपवायला तू माझ्याच मनात येशील
चांदण्याची शीतलता आजही ,
ढगाआडून मोकळी होत होती,
चंद्र होता एकटाच आकाशात ,
त्याची चांदणी मात्र माझ्या कुशीत होती
ढगाआडून मोकळी होत होती,
चंद्र होता एकटाच आकाशात ,
त्याची चांदणी मात्र माझ्या कुशीत होती
काळोखी रात्र अन् स्वप्ने चंद्राची,
पाऊसच सांगे मज गोष्ट थेंबांची,
रोमांचीले शरीर अन् हुरहूर ती मनाची,
प्रेमवर्षावात माझ्या तळमळ या चारोळीची
